Elon Musk : ट्विटरचे सीइओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ते म्हणाले की, याद्वारे आपण विश्वाचे खरे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, xAI च्या टीमचे नेतृत्व एलॉन मस्क करणार आहे. कर्मचार्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये यापूर्वी काम केलेले अधिकारी असतील. ज्यामध्ये Google, Microsoft, DeepMind आणि Tesla यांचा समावेश आहे.
AI तंत्रज्ञानाला आव्हान देणारी घोषणा
९ मार्च २०२३ रोजी xAI कंपनीच्या स्थापनेबद्दल माहिती उघड करण्यात आली होती. xAI कंपनीचं मुख्यालय यूएसएच्या टेक्सासमधील नेवाडा येथे आहे. टेस्ला, स्पेसएक्सचे सीईओ आणि एलॉन मस्क यांनी बुधवारी केलेली ही घोषणा ChatGPT सारख्या AI तंत्रज्ञानाला आव्हान देणारी घोषणा असल्याचे मानले जाते. मस्कने ट्विट केले की विश्वाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी मी xAI नावाची नवीन AI कंपनी सुरू करत आहे. सध्याच्या मोठ्या AI कंपन्यांबद्दल जोरदार चर्चा सुरूये. पहिली म्हणजे ओपनएआयची चॅटजीपीटी (OpenAI ChatGPT) तर दुसरी गुगल बार्ड (Google Bard) आहे.
‘थ्रेड्स’ प्लॅटफॉर्मवरील वादांमुळे एलॉन मस्क आणि ट्विटर चर्चेत
xAI टीममध्ये निवडलेल्या सुप्रसिद्ध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना DeepMind च्या Alphacode आणि OpenAI च्या GPT-३.५ आणि GPT-४ चॅटबॉट्स सारख्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा खूप अनुभव आहे. खरं तर, एलॉन मस्क २०१५ मध्ये OpenAI चे सह-संस्थापक होते. ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने आणलेल्या नवीन ‘थ्रेड्स’ प्लॅटफॉर्मवरील वादांमुळे एलॉन मस्क आणि ट्विटर चर्चेत आहे. यामुळे ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क संतापले आहेत.