मुंबई : कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन Budget Session सुरू झाले आहे आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात…
- 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव
- जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार
- नवीन सुक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. राज्यात 18 लघु उद्योग स्थापन करणार, डाओसमधील करारानुसार 3 लाखाहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत.
- सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार
- सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार
- नगरविकासासाठी 10हजार कोटी रुपयांची तरतुद. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.
- वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यात 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार
- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे
- महिलांसाठी 5,000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार
- हर घर जल योजनेतून 1 कोटी नळ जोडण्यात येणार आहे
- जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम शासन देणार आहे.
- रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी
- मिरकरवाडा बंदराचे नूतनीकरण करण्यात येत आहे
- संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे
- वर्सोवा वांद्रे ते पालघर हा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे
- मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
- निर्यात वाढवण्यासाठी 5 इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करण्यात येत आहे
- ग्रामीण भागात १ कोटी ४८ लाख नळ जोडणार
- १ लाख रोजगार, २० हजार कोटींची गुंतवणूक
- नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार
- लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार
- मूर्तीजापूर-यवतमाळसाठी ५० टक्के निधी
- ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार ठाण्यापर्यंत
- राज्यात १८ वस्त्रोद्योग उभारले जाणार
- वरळी- नरिमन पॉईंट कोस्टल रोड अंतिम टप्प्यात आहे
- राज्यात सहा वंदे भारत एक्स्रेस सुरु आहेत
- नियोजित रस्त्यांसाठी ६ हजार कोटींचा प्रस्ताव आहे
- १९ हजार ९०० कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.नगर विकास विभागासाठी ९ हजार कोटींचा निधी
- फलटण ते पंढरपूर महामार्गाला मान्यता
- शकुंतला रेल्वेसाठी ५० टक्के मदत करण्यात आलीये
- नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचं भूसंपादन प्रक्रिया सुरुय
- रेडियो क्लब इथं जेटींसाठी बंदर बांधण्याचं काम हाती घेतलंय
- नगर विकास सेठी १० हजार कोटी तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी १९ हजार कोटी रुपये देणार










