मुंबई : आज सकाळी अभिनेत्री पूनम पांडे Poonam Pandey Passes Away हिचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाले अशी बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला. तिच्यासोबतच्या काही कलाकारांनी देखील खरंतर तिच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं. पण त्यासोबतच त्यांना प्रचंड धक्काही बसला. कारण दोन-तीन दिवसांपूर्वीच पूनम पांडे ही मुंबईत शूटिंग करत होती. त्यावेळी तिला पाहून ती एवढ्या मोठ्या आजाराशी झुंज देत असेल असं वाटलं नाही असं तिच्या सह अभिनेत्याचं म्हणणं आहे.

खरंतर कोणाचा मृत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यात अवघ्या 32 व्या वर्षी कॅन्सरने निधन होणे हा पूनमच्या चाहत्यांसाठी धक्काच आहे. पण जर तिचं निधन झालं आहे तर आता तिचे शव नक्की कुठे आहे ? आणि अंतिम संस्कार केव्हा आणि कुठे केले जाणार आहेत ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अभिनेत्री पूनम पांडेच्या सोशल मीडिया अकाउंट वरून आज सकाळी ही माहिती दिली. पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. परंतु त्यानंतर यावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पुनमच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून ही माहिती प्रसारित केली गेली असल्याकारणाने ती सत्य मानली गेली आहे.

परंतु युजरचे म्हणणे आहे की तिचे अकाउंट हॅक झाले असू शकते. तसेच आगदि तीन-चार दिवसांपूर्वी तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून जे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यानुसार ती एवढ्या मोठ्या आजाराशी झुंज देत असावी असे वाटत नाही. अशी शंका देखील काही जणांनी उपस्थित केली आहे.