कोची : येत्या २२ जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दरम्यान अयोध्येमध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी त्रिशूरमधील गुरुवायूर मंदिरात पूजा केली. त्याचवेळी त्यांनी कोची येथे चार हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. कोचीमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “केरळच्या प्रकल्पांचे आज उद्घाटन करण्यात आले.
केरळमधील ‘या’ राम मंदिराचा देखील पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला
बुधवार दि. १७ जानेवारीला सकाळी केरळच्या गुरुवायूर मंदिरात पूजा करण्याची संधी मला मिळाली. केरळच्या विकासाच्या जल्लोषात सहभागी होण्याची संधी मला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी ३० डिसेंबर रोजी अयोध्येत महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना मी रामायणाशी संबंधित केरळमधील चार पवित्र मंदिरांबद्दल बोललो होतो. ही चार मंदिरे राजा दशरथाच्या चार पुत्रांशी संबंधित आहेत. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मला त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिरात पूजा करण्याची संधी मिळाली आहे. असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.









