नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने Delhi High Court भारतपेचे BHARAT PAY सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर Ashneer Grover यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. खरं तर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आज उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी या प्रकरणी आपला निकाल दिला. ग्रोव्हर यांनी दिलेली माफी आणि आश्वासन रेकॉर्डवर घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या निकालात म्हटले आहे. न्यायालय हे प्रकरण हलक्यात घेऊ शकत नाही. त्यामुळे ग्रोव्हरला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अश्नीर ग्रोव्हरला प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागणार आहे. या प्रतिज्ञापत्रात ते भविष्यात अशी कोणतीही मानहानीकारक पोस्ट टाकणार नाहीत, असे आश्वासन देणार असून त्यांनी आपल्या भूतकाळातील वागणुकीबद्दल माफीही मागितली आहे. याशिवाय त्यांना 2 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ही रक्कम उच्च न्यायालय लिपिक संघटनेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
‘भारतपे’चे सहसंस्थापक आणि ‘शॉर्ट टँक इंडिया’ या मालिकेचे माजी परीक्षक अश्नीर ग्रोव्हर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या त्यांच्या पत्नीवरील फसवणुकीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अश्नीर ग्रोव्हरवर कोट्यवधी रुपयांच्या बनावट पावत्यांचा अपहार केल्याचा ही आरोप आहे.
दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा अश्नीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी जैन यांच्यावरील आरोपांची चौकशी करत आहे. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांशी संबंधित कंपन्यांनी फिनटेक युनिकॉर्नसाठी बनवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बनावट पावत्या वापरल्याचे समोर आले आहे.
भारत पेने ज्या कंपन्यांना पैसे दिले होते, अशा अनेक कंपन्या तपास यंत्रणेला अद्याप सापडलेल्या नाहीत. टीम सोर्स, टीम वर्क्स, वर्धमान मार्केटिंग, ट्रू वर्क कंपनी, व्हिस्टा सर्व्हिसेस, इव्हॉल्व्ह बीजीसर्व्ह, विकास एंटरप्रायजेस या एचआर कन्सल्टन्सी कंपन्यांना भारत पेने कामावर घेतले होते. या सर्वांनी आरोपी कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाइकांना एकच पत्ता सांगितला.
ईओडब्ल्यूने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या चौकशी अहवालातही पहिल्या पाच पावत्यांमध्ये बँक खात्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी ती खातीही उघडली जात नव्हती. यावरून हे स्पष्ट होते की, या पावत्या नंतरच्या तारखेला तयार करण्यात आल्या होत्या. काही कंपन्या आणि बँक खाती केवळ काही व्यक्तींना फायदा करून देण्याच्या आणि पैशांचा अपहार करण्याच्या हेतूने उघडण्यात आली होती.
बनावट एचआर कन्सल्टन्सीला ७.६ कोटी रुपये देण्यात आले. त्याचबरोबर जीएसटी अधिकाऱ्यांना दंड म्हणून १ कोटी ६६ लाख रुपये देण्यात आले. त्याचबरोबर ७१ कोटी ७६ लाख रुपयांचे बनावट व्यवहारही उघडकीस आले. अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबियांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही तपासात समोर आले आहे.