महाराष्ट्र : महाराष्ट्रात Maharashtra गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यात बस, रेल्वे आणि विमान वाहतूक अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता राज्यातील काही प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये नवीन वाहनतळ उभारले जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
वास्तविक केल्या काही वर्षांमध्ये राज्यातील तीर्थक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. भाविक तीर्थक्षेत्रावर दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. दरम्यान भाविकांची तीर्थक्षेत्रावर वाढणारी गर्दी लक्षात घेता वर्तमान शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पवार यांनी राज्यातील आळंदी, देहू आणि पंढरपूर परिसरात अत्याधुनिक बसस्थानक निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आळंदी, देहू आणि पंढरपूर परिसरात अत्याधुनिक बस स्थानक तयार करून त्यावर रॅम्प सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उपमुख्यमंत्री महोदय यांनी नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. खेड-आळंदी मतदारसंघातील विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
ही बैठक राजधानी मुंबईत पार पडली असून या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदय यांनी हे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या बैठकीत खेड-आळंदी मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांचे देखील उपस्थिती होती. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ख्यातनाम असलेल्या आळंदी येथे वर्षभर भाविकांची वर्दळ पाहायला मिळते. विशेष म्हणजे या तीर्थक्षेत्रावर आषाढी एकादशीच्या काळात या ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ वाढत असते.
हे वाचलेत का ? Income Tax Department Raids ! छत्रपती संभाजीनगरात एकाचवेळी 11 ठिकाणी आयकर विभागाची धाड; 200 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समावेश
त्यामुळे भाविकांना अनेकदा वाहतूक कोंडीचा देखील फटका बसतो. वाहतूक कोंडीमुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून या तीर्थक्षेत्रावर भेटी देणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहन तळाची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.