मुंबई : एव्हिएशन क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येते आहे. आज थोडी थोडकी नाही तर तब्बल 78 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानांची उड्डाण एअर इंडियाला रद्द करावी लागली आहेत. याचं कारण सांगितलं जात आहे की एअर इंडियाच्या Air India कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेतली आणि या रजेच कारण हे सर्वांनीच आजारपण असे सांगितले आहे.
आता तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की सगळेच कर्मचारी अचानक आजारी कसे पडले? तर याला मूळ कारण असं आहे की एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचं लवकरच विलीनीकरण होणार आहे. आणि त्यामुळे नोकरी जाण्याची भीती आता सर्व कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे दोन्हीही एअरलाइन्सच्या वैमानिक आणि केबिन कृ मेंबर्सनी तब्येत बरी नसल्याचं कारण देऊन सामुहिक रजा घेतली आहे.
परंतु याचा मोठा परिणाम आता दोन्हीही एअरलाईनला भोगाव लागतोय. कारण तब्बल 78 उड्डाण रद्द करावी लागली आहेत. एअरलाईनलाच नाही तर प्रवाशांना देखील आता मोठ्या समस्येला सामोरे जावं लागणार आहे. दरम्यान नागरी विमान वाहतूक अधिकारी या घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान जे प्रवासी एअर इंडिया विमानाने प्रवास करणार आहेत त्यांनी चौकशी करावी असं आवाहन एअर इंडियाच्या वतीने करण्यात आलं आहे.