हल्लीचा जमाना हा ब्रँडचा आहे त्यामुळे आजकाल आपण प्रत्येक गोष्टीत ब्रँड्स शोधत असतो.कारण ब्रँडेड वस्तूचां वापर करणे हे एक स्टेटस झाले आहे. तर बाजारात सुध्दा जगप्रसिद्ध ब्रँड्सची काही कमी नाहीये,असेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दोन ब्रँड म्हणजे Adidas आणि PUMA. या दोन्ही नामांकित कंपन्यांचे शूज किंवा बुट आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे असतीलही किंवा नसले तरी या दोन्ही जगप्रसिद्ध ब्रँड्ची नावं आपण कधीना कधी ऐकली असतीलच,पण तुम्हाला माहितीये का? हे दोन्ही लोकप्रिय ब्रँड दोन सख्ख्या भावांच्या वादातून स्थापन झाले आहेत कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. 1924 साली जर्मनीतील Adolf व Rudolf या दोन डॅसलर बंधूंनी एका लहान लॉड्रीच्या दुकानापासून सुरू केलेली ही शूज कंपनी पुढे काही कारणांनी दोघांमधील भांडणामुळे वेगळी झाली आणि जगाला आदिदास आणि पूमा हे दोन ब्रँड मिळाले.तर नेमका काय आहे या दोन्ही ब्रँडच्या स्थापनेमागचा रंजक इतिहास जाणून घेऊ.
जगभरातील तरुणाच्या विशेष म्हणजे खेळाडूंच्या आणि सेलिब्रिटीच्या पसंतीला उतरलेले जर्मनीतले आदिदास आणि पुमा हे ब्रँड निर्माण होण्यापूर्वीची ही गोष्ट विसाव्या शतकाच्या सुरुवातीची आहे.जर्मनी मधील एका लहान गावातील सर्वसामान्य घरातला ख्रिस्टोफस डॅसलर नावाचा तरुण हा एका शूज कंपनीत काम करायचा तर त्यांची पत्नी ही घरच्याघरी लॉण्ड्री चालवायची याच दाम्पत्यांना रुडॉल्फ आणि एडॉल्फ ही दोन मुले होती यातील मोठा मुलगा रुडॉल्फ हा तेथील एका फॅक्टरीत जॉब करत होता तर एडॉल्फ हा जर्मन सैन्यात सैनिक होता.पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून कर्तव्य बजावलेला हाच एडॉल्फ उर्फ एडी १९१९ साली आपल्या मूळ गावी आला आणि इथेच काही तरी व्यवसाय करायचा या विचाराने दिवसातील बराच वेळ तो मैदनावर घालवू लागला.विशेष म्हणजे मैदनावर खेळण्यासाठी स्वतःला लागणारे बुट तो स्वतचं बनवत होता कारण वडिलांकडून तो ते शिकला होता.आणि मग एक दिवस त्याच्या डोक्यात विचार आला की आपणही असेच शूज बनवून व्यवसाय सुरू केला तर आणि एडॉल्फ ने या विचाराला कृतीचे रूप दिले व त्याच्या या निर्णयात त्याला साथ दिली त्याचा मोठा भाऊ रुडॉल्फ याने.ते साल होते १९२४ या वर्षी या दोन्ही भावांनी Dassler Brothers नावाने एक स्पोर्ट शुज कंपनी सुरू केली आणि व्यवसाय सुरू केला आणि पुढील काहीच वर्षात या व्यवसायात डॅझलर बंधूंनी खूप प्रगती केली.आणि त्यांनी केलेल्या या प्रगतीमुळे जर्मनीत त्यांना एक नवी ओळख मिळाली आणि नवउद्योजक म्हणून आता त्यांचा नावलौकिक वाढु लागला.पुढे काही वर्षांनी १९३६ मध्ये एडॉल्फ डॅसलरला अजून एक संधी खुणावू लागली.त्याचे कारण होते त्यावर्षी बर्लिन येथे होणारी समर ऑलिम्पिक्स हीऑलिम्पिक आपल्या व्यावसयासाठी उपयुक्त ठरेल हे एडॉल्फने जाणलं.आणि शूज ने भरलेली बॅग घेऊन एडॉल्फ डॅसलर ऑलिम्पिक नगरीत दाखल झाला.व त्याने अमेरिकेचा धावपटू जेस्सी ओवेन्स याला आपले स्पोर्ट्स शूज स्पॉन्सर केले.आणि त्याचवर्षी जेस्सीने चक्का चार सुवर्णपदके जिंकली.जेस्सीच्या या विजयामुळे त्याचे नाव तर झालेच पण डॅसलर शू फॅक्टरीचं नाव ही सर्वदूर पसरल.आणि त्यावेळी डॅसलर शू फॅक्टरी वर्षांला तब्बल दोन लाख शूज विक्री करू लागली.पण प्रत्येक व्यवसायाला यशाच्या शिखरावर पोहचल्यावर दुहीचा शाप असतो तसेच काही इथे झाले.

ऑलिम्पिक नंतर एडॉल्फची जगभरातील खेळाडूसोबत भेटीगाठी सुरू झाल्या त्यामुळे त्यांची लोकप्रियता सुध्दा वाढू लागली होती आणि याचा राग रुडॉल्फच्या मनात होता. त्यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले.पुढे १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले व या महायुद्धाच्या दरम्यान हे दोन्ही भाऊ नाझी दलात सामील झाले आणि काहीच दिवसात या युध्दात अमेरिकी सैन्याने रुडॉल्फला अटक केली व यावेळी त्याचा असा गैरसमज समज झाला की एडॉल्फनेच त्याला अटक करण्यासाठी अमेरिकन सैन्यासाठी मदत केली आणि त्यामुळे सांमजस्यापेक्षा कटुता वाढत गेली व याच गैरसमजांमुळे दोन्ही डॅसलर बंधूत वाद झाला.पुढे हा वाद इतका विकपोला गेला की जवळपास तीस वर्षांचा कौटुंबिक व व्यावसायिक संसार मोडून हे दोन सख्खे भाऊ १९४७ मध्ये अधिकृतपणे वेगळे झाले व त्यानंतर रुडॉल्फने स्वत:ची शू कंपनी सुरू केली व त्या कंपनीचं नाव ठेवले रुडा हे नाव त्याने स्वतच्या रुडॉल्फ डॅसलर या नावातील सुरुवातीची दोन अक्षरं घेऊन तयार केले होते परंतु कालांतराने हाच ‘रुडा’ ब्रॅण्ड नव्या नावासह समोर आला तो म्हणजे आताचा PUMA हा शू ब्रँड.तर एडॉल्फने सुध्दा हाच फंडा नावासाठी वापरला आणि Adolf Dassler मधली सुरुवातीची अक्षरं वापरून तयार झाला नवा ब्रॅण्ड Adidas.तर आपल्या पूर्वीच्या अनुभवाच्या जोरावर या दोघांनी पुन्हा एकदा एकच व्यवसाय केला.तो म्हणजे शूज बनवण्याचा आणि हेच दोन्ही ब्रँड आज जगाभरात प्रसिद्ध आहेत.तर मार्च २०१६ मध्ये या दोन्ही भावांच्या जीवनावर आधारित चित्रपट मध्ये जर्मनीत प्रदर्शित झाला होता तर अशी होती आदीदास आणि पुमा दोन ब्रँडची गोष्ट.
