Winter Session : भारतातील संसदेचे हिवाळी अधिवेशन Winter Session 4 डिसेंबर 2023 पासून सुरू होते आहे. हे अधिवेशन 22 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या 19 दिवसांच्या 15 बैठका होणार आहेत. संसदीय कार्य मंत्र्यांनी विरोधकांना चर्चा आणि सहकार्याचे आवाहन केले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सचिवालयाकडून खासदारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहे. सरकार या अधिवेशनात 7 वेगवेगळी विधेयके आणू शकते. दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या सभागृह नेत्यांसोबत 2 डिसेंबर 2023 रोजी सर्वपक्षीय बैठक होणार आहेत.
हे वाचलेत का ? Deputy CM Ajit Pawar ! राज्यातील ‘या’ शहरांमध्ये विकसित होणार अत्याधुनिक बस स्थानक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून सुरु होत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सचिवालयाकडून खासदारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहे. सचिवालयाने खासदारांना संसदीय प्रथा, परंपरा आणि आचार संहितेचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सभागृहात ‘धन्यवाद’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’, थँक्यू, थँक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी करू नये अशा सूचना राज्यसभा सचिवालयाने दिल्या आहेत.
सचिवालयाने काय सूचना दिल्या ?
▪️सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखावी.
▪️सभागृहात ‘धन्यवाद’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’, थँक्यू, थँक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी करू नये.
▪️सभागृहात अध्यक्षांनी केलेल्या आदेशाचे पालन केले जावे.
▪️सभागृहात किंवा बाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राज्यसभा किंवा लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करू नये.
▪️ प्रत्येक सदस्याने सभागृहात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना अध्यक्षांना नमस्कार करावा.
▪️ प्रत्येक सदस्याने कामकाजात व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीने सभागृहात प्रवेश करावा.
▪️सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल या प्रकारे सदस्यांनी आपापसात बोलू नये.
▪️सदस्यांनी भाषण संपल्यानंतर लगेच सभागृहाबाहेर पडू नये.
▪️विषय मांडण्यासाठी दिलेली नोटीस कोणत्याही सदस्याने मान्य होईपर्यंत प्रसिद्ध करू नये.