मुंबई : मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त काळ प्रलंबित राहिलेला आणि चिघळलेला मुद्दा म्हणावा लागेल. खरंतर राज्य सरकारने यावर तोडगा काढण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न केला आहे. परंतु मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील आता आक्रमक झाल्याच चित्र आहे. यावेळी जरांगे पाटील आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन सरकारवर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ” ही मॅच फिक्सिंग आहे का ? जरांगे पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकले. ते पुढे असावे सत्ताधारी आणि जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हा त्यांच्यातील प्रश्न आहे. तर जरांगे यांना असं बोलायला लावणं हे कुणाचं पाप आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. चर्चेसाठी भाजपचेच लोक होते. तुम्ही जे पेराल ते उगवते विश्वास कुणावर ठेवायचा अशी माणसे फोडून अनेक बंद झालेत असा थेट निशाणा राज्य सरकारवर विजय वडेट्टीवार यांनी साधला. त्याचबरोबर ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत. त्यांनी अशी भाषा वापरू नये असा टोला देखील त्यांनी मनोज जरांगे यांना लगावला आहे.