बिहार : बिहारच्या बक्सर परिसरामध्ये नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. तुरीगंजी ते रघुनाथपूर दरम्यान हा अपघात झाला असून यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 80 प्रवासी जखमी झाले आहेत.
ही ट्रेन दिल्लीहून कामाख्या या ठिकाणी जात असताना ट्रेनचे वीस डबे रुळावरून घसरले आहेत. जखमी प्रवाशांना पाटणा येथील आयजीआयएमएस या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून बचाव कार्य देखील सुरू आहे. एनडीआरएफ , एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.