नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटातील तीन दोषींची सुटका; श्रीलंकेला परत रवानगी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणांमध्ये अटक असलेल्या तीन आरोपींची सुटका करण्यात आली आहे. माफीच्या तत्त्वावर या तीन दोषींना मुक्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या मायदेशी श्रीलंकेला परत पाठवून देण्यात आला आहे.
21 मे 1991 ला राजीव गांधी यांची रॅली दरम्यान हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी यांच्या गळ्यात एका महिलेने फुलांचा हार घातला. या हारामध्येच बॉम्ब होता. याप्रकरणी या तिघा जणांसह समंथ, पेरारीवलन, नलिनी, रविचंद्र हे चार जण देखील दोषी होते. यातील चार जणांना मृत्यू दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर या तिघा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

आज चेन्नई विमानतळावरून सकाळी या तीन दोषींची रवानगी मायदेशी श्रीलंकेला रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये मुगुरन, रॉबर्ट आणि जयकुमार अशा तीन आरोपींना मुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या तिघांची शिक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने संविधानातील विशेष अधिकारा अंतर्गत त्यांची सन 2022 मध्ये सुटका केली होती. त्नंतर त्यांना त्रिची निर्वासित छावणीमध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या असून केंद्रीय गृह खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे दोन एप्रिल 2024 ला या तिघा जणांची सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी आता श्रीलंकेला करण्यात आली आहे.