जालना : सभेमध्ये प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणले कि, ” तो एकदिवस म्हणाला, आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बुवा, आपल्या एकट्याच्याच मागे लागलेत. आरक्षणाला विरोध नाही म्हटल्यावर आपण बोलायला बंद केलं. पण कालपरवा तो परत फडफड करायला लागलाय. ते म्हणतंय, सात कोटी खर्च आलाय. अरे काय वावर घेतलंय का येडपटा…100 एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलं भाड्यानं. एका शेतकऱ्यानं फुकट दिलंय, येऊन विचार. तो म्हणतोय, लोक आता 10 रुपये देत नाहीत, अरे तुला देत नसतील. अरे तुला का देत नसतील तर, ज्या गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमावला, त्यामुळे तुझ्याकडे धाड पडली, ज्यांचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष बेसन खाऊन आलास आत. आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले? माझा मायबाप मराठा काबाडकष्ट शेतात करतो. आम्ही घाम गाळतो घाम. माझ्या मायबापानं घाम गाळून हजार, पाचशे रुपये जमा केले आहेत आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठ्यांची सेवा करण्याचं काम 123 गावकऱ्यांनी केलं आहे. तुझ्यासारखं नाही आमचं.”, असं जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले की, “एक टरमाळं मधीच उठलं आणि लागलं मागे, तो देखील उपमुख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता आहे, असं म्हणतात लोक. उपमुख्यमंत्र्यांनी येडपटं पाळतील कशी, त्यात उपमउख्यमंत्री एक आहेत, ती एक पंचायत झाली. ते रात्री म्हटलं जरांगेंना अटकच करा. तो म्हणतोय मी हिंसा करिन, अरे मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाही. त्याला यश मिळवायचं होतं, त्यावेळी त्यानं एक मराठा, लाख मराठ्याची घोषणा दिलेली आझाद मैदानात, पण आता एक लाख मराठे एकत्र आलेत, तर तिथं सांगतो ते हिंसा करणार आहेत, त्याला अटक करा. मला अटक करणं सोप्पं आहे का आता ?”
महाराष्ट्रतला मराठा समाज निधी देणार होता, जाहीर सांगतो. पण आम्ही सांगितलं, आम्हाला सेवा करायची आहे, एक रुपयाही नको. आम्ही 123 गावातून निधी गोळा केला आणि त्यातून 21 लाख जमा झाले. लगेच हिशोब घे म्हणावं त्याला सात कोटी वाल्याला. हे मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी नाही, ते सात-आठ वेळा जाऊन आलंय, आणखी जायची वेळ आली त्याची परत, असं म्हणत छगन भुजबळांना जरांगेंनी सणसणीत टोला लगावला.
टोटल 21 लाख जमा झाले, 123 गावांतून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले, तेच 21 लाख झालेत, आपल्याकडे आणखी 101 गावं शिल्लक आहेत, त्यांच्याकडे पैसे जमा आहेत, पण ते आपण घेतलेले नाही, कारण हे आंदोलन पैशांसाठी नाही जनतेसाठी आहे, असं म्हणत जरांगे पाटलांनी संपूर्ण हिशोब जाहीर केला आणि भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. पुढे जरांगे म्हणाले की, त्याला वावर घ्यायचं लागलंय वेड, ते घेतंय वावरं, पैसे खातंय जनतेचं, त्याला वाटलं सभेसाठी आपण वावरंच विकत घेतलं. ते म्हणतंय सात कोटी खर्च आला, पण कोटीच पहिल्यांदा ऐकलंय आम्ही. काय म्हणावं एवढ्या मोठ्या नेत्याला कळालं पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुमच्या पक्षाचा आहे, त्याला जरा समज द्या. नाहीतर मी असा मागं लागंल, माझ्या नादाला लागलं तर मी सोडतंच नाही.