नवी दिल्ली : 2029 पासून लोकसभा निवडणुकांसोबतच सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या सूत्रावर काम करत आहेत अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली आहे. लोकसभा राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी सरकारने आधीच एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून विधी आयोगाने राष्ट्रीय आणि राज्यांच्या निवडणुकांसाठी सध्याच्या शिफारशींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही समाविष्ट करण्यास सांगितले जाऊ शकते. त्यामुळे मतदारांचा त्रास वाचणार आहे. लोकसभा विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची व्यवस्था केल्यावर दोन्हीही निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी मतदारांना मतदान केंद्राला एकदाच भेट द्यावी लागावी यासाठी हे नियोजन आहे.
त्री-सदस्य निवडणुका एका वर्षात दोन टप्प्यात घेण्यात याव्यात, पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ शकतात. तर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. अशी शिफारस विधी आयोग करू शकते. देशातील विविध हवामान परिस्थिती लक्षात घेऊन व्यवहारीक दृष्टिकोन असल्यास देखील म्हटले जात आहे.