मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या पोलीस स्टेशनच्या लोकांमध्ये आज एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पवई भागात दोन दिवसापूर्वी एअर होस्टेस ची गळा चिरून हत्या करणारा आरोपी विक्रम अटवाल यांनी पॅन्टच्या सहाय्याने गळफास लावून घेतला शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पवई येथे राहणाऱ्या रूपं आग्रे नावाच्या ट्रेनिंग एअर होस्टेस च्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली होती विक्रम अटवाल हा सफाई कामगार होता दोन दिवसापूर्वी त्याने रुपल आग्रे हीची गळा चिरून हत्या केली होती आठ सप्टेंबरला न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती मात्र आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःच्या पॅन्ट ने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
रविवारी सकाळी रूपल ही तिच्या राहत्या प्लेटमध्ये तिच्या कुटुंबीयांसोबत बोलत होती मुंबईतील रूपल मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळील कृष्णलाल मारवाहा मार्गावरील एनजी कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये ती तिची बहीण आणि तिच्या मित्रासोबत राहत होती ते दोघेही कामानिमित्त मुंबईच्या बाहेर गेले असताना हा प्रकार घडला आहे व्हिडिओ कॉल वर बोलत असताना मोबाईल अचानक बंद पडल्याने तिच्या कुटुंबीयांना काळजी वाटली म्हणून त्यांनी रूपाच्या मित्र-मैत्रिणींना फोन केला त्यातील एका मित्राने घटनास्थळी जाऊन पाहिले असता रूपाच्या फ्लॅटला कुलूप दिसले त्यानंतर याबाबत सोसायटीला माहिती दिली असता डुप्लिकेट चावीने पोलिसांनीच दरवाजा उघडला असता रुपये त्यांना मृता अवस्थेत आढळून आली होती रूपाचा गळा चिरून खून करण्यात आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम याची रूपलवर वाईट नजर होती यापूर्वीही त्याने रूपल सोबत गैरवर्तन केले असल्याचे समजते फ्लॅटमध्ये कचरा गोळा करण्यासाठी गेला असता रुपये तो घरात आला म्हणून आक्षेप घेतला यावेळी दोघांमध्येच बाचाबाची देखील झाली यावेळी त्याने रुपाची गळा चिरून हत्या केली आहे.
दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक तपास करून विक्रम याला अटक केली होती परंतु विक्रम याच्या आत्महत्येने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.