Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढतच आहेत. समृद्धीवरील अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. समृद्धी महामार्गावर पुन्हा मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळली. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली. अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाचं काम सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर मशिनच्या सांगाड्याखाली काही जण अडकल्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ‘मी पिलरजवळ काम करत होतो, तेव्हा क्रेन कोसळली, गर्डरही कोसळलं, त्याच्याखाली मजूर दबले गेले. या दुर्घटनेत माझ्या ओळखीचे आणि जवळचे चार जण होते.काही समजण्याच्या आतच गर्डरसकट क्रेन देखील खाली कोसळली. त्या व्यक्तीने सांगितले की, मी आणि आणखी एक व्यक्ती बाहेर निघाली असंही त्याने पुढे सांगितले आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफचे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार सरलांबे या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. या घटनेत गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरून मजुरांवर कोसळला. सुरक्षेबाबत कोणतीही उपययोजना नसल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशन दल आणि एनडीआरफच्या पथकाकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.