नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक चांगली बातमी आहे. एलपीजीच्या दरात घट LPG Prices करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे आज पासून 19 किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या दरात घट करण्यात आली असून 30 रुपये 50 पैशांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महागाईने अक्षरशः थैमान घातले. बेरोजगारी आणि त्यात महागाई यामुळे सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरड मोडले. अशातच आता नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरू होते आहे. आणि पहिल्याच दिवशी एक चांगली बातमी समोर येते ती म्हणजे एक एप्रिल पासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तीस रुपये 50 पैशांची कपात होते आहे.
दरम्यान दिल्लीमध्ये 30 रुपये 50 पैशांनी दर कमी झाले आहेत. तर मुंबईमध्ये हेच दर 31 रुपये 50 पैशांनी कमी झाले आहेत.
व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये हे बदल झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणतेही बदल झाले नसून दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत ही 803 रुपये आहे. तर महाराष्ट्र मुंबईमध्ये हीच किंमत 802 रुपये 50 पैसे आहे.