RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यात 16 दिवस बँका बंद राहाणार आहेत. त्यामुळे बँकेत जाऊनच व्यवहार किंवा इतर महत्वाची कामे असतील तर ती वेळीच पूर्ण करा. 16 दिवसांच्या बँक सुट्ट्यां जाहीर करण्यात आल्या ससून यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार तसेच पोंगल, राज्य दिन , स्वामी विवेकानंद जयंती यांचा समावेश असणार आहे. बँक बंद असल्या तरी देखील नागरिकांना मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे काम पूर्ण करु शकता.
RBI ने दिलेल्या माहिती नुसार या दिवशी बँक राहणार बंद
▪️ 1 जानेवारी- नववर्षाभिनंदन
▪️7 जानेवारी – रविवार
▪️11 जानेवारी – मिशनरी डे (मिझारोम)
▪️12 जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती
▪️13 जानेवारी – दुसरा शनिवार
▪️14 जानेवारी – रविवार
▪️15 जानेवारी – पोंगल
▪️16 जानेवारी – तुसू पूजा
▪️17 जानेवारी – गुरु गोविंद सिंह जयंती
▪️21 जानेवारी – रविवार
▪️23 जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
▪️25 जानेवारी – राज्य दिन (हिमाचल प्रदेश)
▪️26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
▪️27 जानेवारी – चौथा शनिवार
▪️28 जानेवारी – रविवार
▪️31 जानेवारी – मी-दाम-मी-फी (आसाम)