पुणे : लोकसभा निवडणुकीच्या Pune Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर सध्या पुण्यामध्ये निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. पुण्यातून भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ, काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंत मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात आता ही तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी मिळावी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट घेतली होती. परंतु काँग्रेसच्या वतीने अखेर रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. ही भेट यशस्वी देखील झाली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंत मोरे यांना मंगळवारी उशिरा उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली होती.
हृदयद्रावक : छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीची भीषण घटना; कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू
मनसेमध्ये अंतर्गत राजकारणानंतर वसंत मोरे यांनी 18 वर्षाच्या निष्ठेवर पाणी सोडत मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्याचबरोबर ही लोकसभा निवडणूक लढवायचीच असा ठाम निर्धार देखील वसंत मोरे यांनी केला. होताच त्यामुळे त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी बरीच धडपड केली. यात आता ते यशस्वी झाले असले तरी रवींद्र धंगेकरांनी त्यांना आता डोकं शांत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. रवींद्र धोंगेकर म्हणाले की, ” लोकशाहीमध्ये कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो. तो ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार आहे. जो उमेदवार लोकशाहीसाठी लढेल. लोक त्यालाच मतदान करतील. वसंत मोरे अनेक पक्षातील नेत्यांना आणि लोकांना भेटले. ते कोणत्याही पक्षात गेले तरी निवडणूक लढवणारच होते. डोके शांत ठेवावे असा सल्ला यावेळी रवींद्र धंगेकरांनी दिला. त्याबरोबरच निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवावी असा खोचक टोला देखील लगावला आहे.