पिंपरी चिंचवड : गेल्या आठवड्यात ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमिंग ॲपवर तब्बल दीड कोटीचे बक्षीस रक्कम जिंकल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडें प्रसिद्धीझोतात आले होते.परंतु याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे झेंडे यांना आता खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. व त्यामुळे आज अखेर झेंडे यांचे गृह विभागाने निलंबन केले आहे.तर झेंडे यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाई मागे दोन प्रमुख कारणे आहेत. ज्यामुळे त्याचे निलंबन झाले ती करणे नेमकी कोणती आणि हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे जाणून घेऊ.
हे वाचलतं का ? MAHARASHTRA POLITICS : शिवसेनेत पुन्हा राजकीय भूकंप ! एकनाथ शिंदे यांचा विश्वासू नेता उद्या शिवसेनेची साथ सोडणार !
सध्या २०२३ क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे त्यामुळे क्रिकेटप्रेमी आपल्या हातातले काम सोडून क्रिकेट मॅच बघत असतात तर काही जण ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमिंग ॲपवर टीम बनवून पैसे लावून गेम खेळत असतात.विशेष म्हणजे तरुणांमध्ये या ऑनलाइन गेम चे जास्त वेड आहे.असेच वेड PSI सोमनाथ झेंडे यांनाही होते व गेल्या तीन महिन्यापासून ते ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमिंग ॲपवर वर्ल्डकप मधील खेळाडूंचा अभ्यास करत टीम तयार करत होते. झेंडे यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर अशीच एक टीम तयार केली आणि ती त्या सामन्यात अव्वल ठरली आणि त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले त्यामुळे झेंडे यांना इतका आनंद झाला की त्यांनी थेट मीडियामध्ये मुलाखती दिल्या आणि हा गेम ते कसा खेळले याबदल सविस्तर माहिती त्यांनी दिली व ही बातमी पोलिस खात्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचली तेव्हा या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले अशातच पिंपरी चिंचवड मधील भाजप पदाधिकारी अमोल थोरात यांनी या प्रकरणात PSI झेंडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र व्यवहार केला.आणि त्यानंतर काही तासातच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली व आता पोलिस उपायुक्तांकडून त्यांची विभागीय चौकशी सुरू होणार आहे.त्यामुळे झेंडे यांच्या अडचणी वाढल्या असून करोडपती झाल्याचा झेंडे यांचा आनंद हा क्षणिकच राहिला आहे. *पण PSI सोमनाथ झेंडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली त्यामागे त्यांनी केलेल्या दोन चुका आहेत आणि त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे त्यातली झेंडे यांची पहिली चूक आहे ती म्हणजे त्यांनी ऑन ड्युटी असताना पोलिस वर्दिवरच ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन गेमिंगमधून पैसे मिळवले आणि झेंडे यांची दुसरी चूक आहे ती म्हणजे त्याच पोलिस वर्दीत माध्यमांपुढं येऊन सांगितले की त्यांनी हा गेम कशाप्रकारे खेळला कसे पैसे लावले त्यांनी केलेल्या या दोन चुकाच त्यांच्यावरील निलंबन कारवाईला कारणीभूत ठरल्या आहेत.
हे वाचलतं का ? वर्दीत Dream 11 चे दर्दी : PSI झेंडे यांच्या अडचणीत वाढ; पोलीस आयुक्तांची कारवाई त्यात आता थेट गृहमंत्री फडणवीसांकडे तक्रार
खरतर तरुणांनी अशा ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊ नये, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये,म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचं आहे.परंतु इथं स्वतः पोलीस अधिकाऱ्यानेच ऑनलाइन गेमिंगमाध्यमातून समाजात एक चुकीचा संदेश दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळच पीएसआय झेंडेना दोषी ठरवन्यात आले आहे.आता विभागीय चौकशीत झेंडे यांना त्यांचे म्हणणं मांडण्याची संधी मिळेल व त्यानंतर नेमकी काय कारवाई होईल हेही समजलेच परंतु झेंडेना दीड कोटीचे बक्षीस लागले म्हणजे इतरांनी तसेच बक्षीस लागेल असे नाही कारण ऑनलाइन फसवणूक करणारे अनेक गेम सध्या अस्तित्वात आहेत त्यामुळे तरुणाई ने किंबहुना सर्वांनीच याबाबतीत सतर्क राहिले पाहिजे.