मुंबई : मराठा आरक्षणा Maratha reservation संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या Backward Classes Commission वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये जात, स्थावर आणि जंगम मालमत्ता, उत्पन्न, शिक्षण, घरातील विविध संसार उपयोगी आणि उपभोग्य वस्तू, कुटुंबीय यांची संख्या, त्याचबरोबर घरातील चाली, प्रथा, परंपरा यांची देखील माहिती घेण्यात आली. परंतु हे सर्वेक्षण घाईघाईने पूर्ण करण्यात आले असून अयोग्य आणि खोटी माहिती नोंदवल्याचा गंभीर आरोप राज्य मागास वर्ग आयोगावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे Prakash Shendge यांनी केला आहे.
आठ ते दहा दिवसांमध्ये तब्बल 1 कोटी 58 लाख कुटुंबांच सर्वेक्षण करण्यात आल आहे. हे सर्वेक्षण योग्य पद्धतीने आणि घाईघाईने करण्यात आलं असल्याचं शेंडगे यांनी म्हटले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शेंडगे म्हणाले की जिथे मराठा कुटुंबाचा बंगला असेल किंवा पक्क घर असेल तिथे झोपडी दाखवण्यात आली आहे तर बागायती जमीन असलेल्या कुटुंबांच्या नोंदीमध्ये कोरडवाहू जमीन दाखवण्यात आली आहे नोकरी करत असलेले लोक रोजंदारीवर कामाला जातात असं दाखवण्यात आला आहे त्यामुळे सर्वेक्षणात चुकीची माहिती नोंदवून आली असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला.
त्याचबरोबर सर्वेक्षण आदरम्यान आधार कार्डचा नंबर देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे जी काही खोटी माहिती नोंदवून घेण्यात आली आहे, त्याचा पर्दाफाश होईल असे देखील शेंडगे यांनी सुचवल आहे. मराठा समाजाचे सर्वेक्षण करून त्यांना मागास ठरवायचं आणि त्यांना आरक्षण द्यायचं हे षडयंत्र आहे. 96 कुळी मराठ्यांना मागासवर्गातून आरक्षण मान्य नाही अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली आहे.