सोलापूर : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर येथील देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता मोदी सोलापूर येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी सोलापूरकरांना संबोधित करताना पंतप्रधान म्हंटले आहे कि, “पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार करतोय” अशी मराठीत सुरुवात करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या दौऱ्यामध्ये आज सोलापूर येथील कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.
सोलापुरातील कामगार आणि छोटे व्यावसायिक यांना आता डोक्यावर छत मिळते आहे. झोपडपट्टीत राहून हाल सहन करणाऱ्या कामगारांना आता स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे.
- कामगार वसाहत ही 350 एकर परिसरात बांधण्यात आली आहे.
- या जागेत तब्बल 834 इमारती उभारण्यात आल्या आहे.
- या इमारतीत 30 हजार फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत.
- या गृहप्रकल्पामध्ये सुमारे 30 हजार कामगारांना स्वतःच हक्काचं घर मिळणार आहे.
या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावनिक झाल्याचं देखील दिसून आलं आहे. आज एक लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृहप्रवेश होणार आहे. सर्वजण आपल्या घरात रामज्योती प्रज्वलित करणार की नाही ? आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं. मला पण लहानपणी अशा घरात राहायला मिळायला हवं होतं, या वाक्यानंतर पंतप्रधान भावनिक झाल्याचं दिसून आलं.