PM NARENDRA MODI : आयसीसी वनडे विश्वचषक 2023 ICC ODI World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर सर्व भारतीय खेळाडूंची मने तुटली आहेत. या पराभवानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM NARENDRA MODI यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावत सर्व खेळाडूंना प्रोत्साहनही दिले.
दरम्यान वर्ल्ड कप 2023 ICC ODI World Cup 2023 फायनलनंतर पंतप्रधान मोदी (PM NARENDRA MODI ) यांनी भारतीय संघातील खेळाडूंसोबत खास बैठक घेतली होती. पंतप्रधान मोदींनी कर्णधार रोहित शर्मा (रोहित शर्मा) आणि विराट कोहली यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला. ‘तुम्ही सर्व १०-१० सामने जिंकले आहेत, हे घडतच राहते. आनंदी रहा, संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत आहे. मला वाटलं मी तुम्हा सगळ्यांना भेटावे म्हणून मी आलो. लवकरच मी तुम्हा सर्वांना दिल्लीमध्ये भेटेन. यावेळी मोह्हम्मद शमीची देखील त्यांनी खास गळा भेट घेतली.
शामीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप
राहुल द्रविडची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रवींद्र जडेजाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं की बाबू… हे ऐकून जडेजा त्यांच्याजवळ आला आणि त्याने हात मिळवला. पंतप्रधान मोदींनी जडेजाच्या पाठीवर ही थाप मारली. पंतप्रधान मोदींनी जडेजाशी गुजराती भाषेत संवाद साधला.