पिंपरी चिंचवड : मधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर माझा मुलगा मला आहे तसा परत द्या ! असा आक्रोश वडिलांनी केला. या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेची हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात सार्थक शिकत होता. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांना लागून असलेल्या लोखंडी रेलिंगवर तो घसरगुंडी खेळत होता. खेळण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. यावेळी तो तळमजल्याच्या डक्टमध्ये पडल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यानच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
प्रत्यक्षदर्शी सार्थकच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘तू इथे खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल’! असं देखील सुचवलं होतं. पण सार्थक असं काही होईल आणि खेळण्याच्या नादात कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसावा. यावेळी तोल जाऊन सार्थक खाली पडला आणि तल मजल्याच्या डक्टमध्ये पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तातडीने सार्थकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याला वाचवू शकले नाही. यानंतर सार्थकच्या वडिलांना त्याच्या दुखापती बाबत कळविले असता ते तातडीने रुग्णालयात दाखल झाले. यावेळी सार्थकच्या वडिलांनी एकच आक्रोश केला. माझ्या मुलाला परत करा, असा एकच आक्रोश वडिलांनी केला. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.
या घटनेनंतर शाळेवर कठोर कारवाई करा अशी मागणी सार्थकच्या वडिलांनी केली आहे या घटनेबाबत आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या घटनेला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होतो. सोशल मीडिया ? खेळताना शाळेत मुलांकडे दुर्लक्ष होतंय का ? मुलांच्या हालचालींकडे पालकांचे लक्ष आणि धाक कमी पडतोय का ? प्रत्येक प्रश्नाला उत्तर नक्कीच मिळू शकतो पण सार्थक परत येऊ शकत नाही हे तितकंच खरं आहे त्यामुळे शाळेत शिक्षकांनी आणि घरात पालकांनी मुलांच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवून त्यांना योग्य अयोग्य बारकाईने पुन्हा शिकवण्याची आवश्यकता असल्याचं म्हणावं लागेल.