नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना भावनिक झाले होते. नव्या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी ते प्रेरणादायी क्षण आणि इतिहासातील महत्त्वाचे क्षण आठवून पुढे जाण्याची ही संधी आहे. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत अशा भावना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.
https://x.com/ANI/status/1703654295248527546?s=20
ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता. मात्र या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासी यांचा पैसा घाम आणि कष्ट आहेत. हे आपण अभिमानाने सांगू शकतो जुन्या संसद इमारतीचं संग्रहालय करण्यात येणार आहे. त्यामुळे संसदेचा इतिहास सामान्य जनतेला पाहता येणार आहे. तसेच नवीन संसद इमारतीत जाण्याची प्रक्रिया भावनिक असल्याचे देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
https://x.com/ANI/status/1703651302088286375?s=20
आपल्या सर्वांच्या आठवणी या जुन्या संसदेत आहेत. 75 वर्षात आपण या सभागृहात अनेक घटना पाहिल्या आहेत. मी जेव्हा खासदार झालो आणि पहिल्यांदा खासदार म्हणून प्रवेश केला तेव्हा स्वाभाविकपणे या संसद भवनात मी माथा टेकवला आणि आदरांजली वाहिली होती , असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.