नवी दिल्ली : संसद घुसखोरी प्रकरणी एक मोठी बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणातील सहा आरोपी सागर शर्मा, अमोल शिंदे, नीलम आझाद, महेश कुमावत, ललित झा आणि मनोरंजन डी यांना शनिवारी पटियाला उच्च न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. दरम्यान या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड हा ललित नसून मनोरंजन डी असल्याचं समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सहा आरोपींपैकी पाच आरोपींची पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार या संपूर्ण घटनाक्रमाचा प्रमुख आरोपी हा ललित झा नसून मनोरंजन डी असल्याचं बोललं जात आहे.
या उद्देशाने करण्यात आली होती संसदेत घुसखोरी
संसदेचे भर अधिवेशन सुरू असताना या आरोपींनी थेट सभागृहात उड्या मारल्या होत्या. तसेच घोषणाबाजी करून धुराच्या नळ काढण्या देखील सभागृहात फेकल्या होत्या बेरोजगारी आणि शेतकरी कुचंबना यावर आवाज उठवण्यासाठी ही घुसखोरी करण्यात आल्याचं या आरोपींच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट मधून उघडकीस आले आहे.