नवी दिल्ली : कोरोना Corona काळ हा संपूर्ण जगभराला अत्यंत कठीण गेलेला आणि वर्षानुवर्षे लक्षात राहील असा होता. कोरोनाचे ते दोन वर्ष अत्यंत भीतीच्या वातावरणाखाली आणि दुःखाच्या सावटाखाली गेले. यावेळी सर्वांना आधार मिळाला तो कोविशील्डचा आणि कोवॅक्सीनचा Covishield , हे वॅक्सिन घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि करोडो नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
परंतु आता तब्बल चार वर्षानंतर कोविशील्ड लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने या लसीचे दुष्परिणाम देखील असल्याचं मान्य केले. दरम्यान ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाने कोरोना प्रतिबंधक लस जगभरातून मागवले आहेत यामध्ये कोविशील्ड देखील समावेश आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेकाने कोरोना प्रतिबंधक लस बनवली होती. परंतु आता थ्रोमबोसिस आणि थ्रोम्बोसायटोपेनियाचे दुर्मिळ दुष्परिणाम या लसीमुळे दिसून येत असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. टीटीएस मूळ रक्ताच्या गाठी होत असून पेशींची संख्या कमी होते. ही शक्यता कमी जरी असली तरी हा गंभीर आजार असल्याच देखील डॉक्टरांनी म्हटल आहे. भारतामध्ये हे प्रमाण कमी आहे हे नशीब मानावं लागेल परंतु भारतातील तब्बल 80 टक्के लोकांनी कोविशील्डच लस घेतली आहे.