नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने देशात दोन वर्ष अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या व्हायरसनं कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त केली. अनेकांनी आपले जीव या व्हायरसमुळे गमावले होते. दरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आता कोरोना पेक्षाही प्राणघातक व्हायरस विषयी अलर्ट जारी केला आहे. हा व्हायरस आहे निपाह व्हायरस…
निपाह व्हायरसमुळे देशात पुन्हा एकदा भीतीच साम्राज्य पसरल आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर अलर्ट जारी केला आहे.
निपाह संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण 40 ते 70 टक्के आहे. हेच प्रमाण कोरोनामध्ये दोन ते तीन टक्के होते. केरळमध्ये निपाहचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोघा जणांचा मृत्यू ओढावला आहे. केरळमध्ये निपाह व्हायरस प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था 24 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कशी घ्याल काळजी
निपाह व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी वारंवार हात धुणे ,फेस मास्क वापरणे, स्वतःची आणि परिसराची स्वच्छता बाळगणे. अशी उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरस प्रमाणेच सर्व काळजी पुन्हा घेणे आवश्यक आहे.