नवी दिल्ली : एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष New Financial Year 2024 सुरू होते आहे. त्या निमित्ताने देशात काही बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या खिशाला हलके करू शकतात. सोन्याचांदीच्या किमतींसह कारच्या किंमती देखील वाढणार आहेत. तर मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत. त्यामुळे या सर्व बदलांविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
1 एप्रिल पासून नेमकं काय बदलणार ?
- नवीन कर प्रणाली सुरू होणार
- कारच्या किमतींमध्ये वाढ
- ज्येष्ठ नागरिकांना बचत आणि योजनांमध्ये अधिकची गुंतवणूक करता येणार
- पेन किलर्स महाग होणार
- व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार
- सोने खरेदी महागणार
- टोलमध्ये वाढ होणार आहे.
एकंदरीतच सोने चांदीच्या किमतींमध्ये वाढ होणार असून त्यासह कार खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असतात तर त्या किमतींमध्ये देखील वाढ होणार आहे नेमकं स्वस्त काय होणार हे पाहूयात.
कॅमेरा, कॅमेरा लेन्स, टेलिव्हिजन, इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल स्वस्त होणार आहेत.
Pan Card- Aadhaar Card लिंक
पॅन कार्डला आधार कार्ड सोबत लिंक करणं अनिवार्य आहे. याची डेडलाईन 31 मार्च 2024 असून, असं न केल्यास तुमचा पॅन क्रमांक बंद होऊ शकतो. 1 एप्रिलनंतर पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये इतकी रक्कम पेनल्टी स्वरुपात भरावी लागणार आहे.
EPFO चा नियम
EPFO कडून एप्रिल महिन्यात नवा नियम लागू करण्यात येणार असून या नियमानुसार आता पीएफ अकाऊंट ऑटो मेडमध्ये ट्रान्सफर होईल. म्हणजेच अकाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट करण्याची गरज नाही. त्यामुळं अनेकांच्याच अडचणी दूर होणार आहेत.
नवी कर पद्धती
तुम्ही करदाते असाल आणि टॅक्स रिजिम निवडलं नसेल तर आधी हे काम उरकून घ्या. कारण 1 एप्रिलपासून नवी करप्रणाली लागू होणार आहे जी सर्वांसाठी सरसकट लागू असेल.
नवीन टॅक्स रेजिमचे टॅक्स स्लॅब्स असे असणार !
3 लाखांपर्यंत – 0%
3-6 लाख – 5%
6-9 लाख – 10%
9-12 लाख – 15%
12 ते 15 लाख – 20%
15 लाखांच्या वरील उत्पन्न – 30%