मुंबई : दिल्लीच्या पाठोपाठ मुंबईमध्ये देखील प्रदूषणाच्या राक्षसाने रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या राजधानीमध्ये वायुप्रदूषणामुळे शाळा बंद, ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम असे अनेक मोठे आणि तडकाफडकी निर्णय घ्यावे लागले आहेत. मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी पाहता वेळेत उपाय योजना करणे आवश्यक आहे. दरम्यान राज्यातील वायू प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. राज्यातील प्रदूषणाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. हवामान बदल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे. बांधकाम साईटवर smog गन स्प्रिंकलर बसवा , Mmrda क्या बांधकाम साईट धुळमुक्त करा, अर्बन फॉरेस्टवर भर द्या, मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी, वॉटर टँकरची संख्या वाढवावी, मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुणार , विविध बांधकाम साईट वर प्रदूषण रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत.
त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे., दोन दिवसांआधी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुंबई आणि आजूबाजूच्या पालिका आयुक्तांची बैठक पार पडली होती, ज्यात आयुक्तांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते.