सांगली : खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर MLA Anil Babar यांचे आज निधन झाले आहे त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले. सांगलीतील रुग्णालयात त्यांना मंगळवारी दाखल करण्यात आलं होतं. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निधनाने खानापूर मतदार संघामध्ये शोककळा पसरली आहे.
सांगलीच्या खानापूर-आटपाडीमधून अनिल बाबर चार वेळा आमदार म्हणून निवडणूक आले होते. 1999 ते 2014 असे 15 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आणि त्यानंतर 2014 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आघाडीच्या काळामध्ये टेंभू योजनेचं काम रखडल्याचा दावा करत त्यांनी पक्षांतर केलं होतं. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते. पण त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख होती.