मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षण हा महाराष्ट्रात कळीचा विषय आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील एकाबाजूला आमरण उपोषणाला बसले आहेत. तर मराठा मोर्चा आंदोलक देखील आक्रमक झाले आहेत. अशातच आज सकाळी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येते आहे. संजय दत्त, सलमान खान या प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सच्या केस लढलेले प्रसिद्ध वकिल सतीश मानशिंदे गुणरत्न सदावर्ते वाहन तोडफोड प्रकरणात अटक झालेल्या मराठा तरुणांचा खटला लढवणार आहेत. महत्त्वाच म्हणजे एकही पैसा न घेता मोफत ते हा खटला लढणार आहेत.
परळ येथील क्रिस्टल टॉवरखाली उभी असलेली गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली. गाडी फोडणारे एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांना अटक केली आहे.
हे वाचलेत का ? “जरांगेंचे लाड थांबवले नाहीत, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल” गुणरत्न सदावर्ते यांचा राज्यसरकारला इशारा
कोण आहेत सतीश मानशिंदे मानशींदे ?
सतीश मानशिंदे हे कायदेशीर क्षेत्रातल मोठ नाव आहे. त्यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या केसेस लढवल्या आहेत. 1983 साली सतीश मानशिंदे यांनी वकिल म्हणून सुरुवात केली. राम जेठमालानी यांच्याकडे त्यांनी दशकभर काम केलं. सतीश मानशिंदे हे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखले जातात. कर्नाटक विद्यापीठातून लॉ कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतलीय. 90 च्या दशकात सर्वप्रथम सतीश मानशिंदे हे नाव चर्चेत आलं. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात बंद असलेला अभिनेता संजय दत्तच वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं.
त्यानंतर 2002 साली हिट अँड रन प्रकरणात बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा खटला ते लढले. त्यांनी सलमानला जामीन मिळवून दिला होता. सतीश मानशिंदे हे अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणात वकील होते. आता त्यांची मराठा आंदोलनात एन्ट्री झाली आहे. मराठा आंदोलकांची केस ती निशुल्क लढणार आहेत.