सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होते आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत मनोज जरांगेंच्या महाराष्ट्रभरातील दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या दौऱ्यातली पहिली सभा आज सोलपुरातील वांगी येथे आजोजित करण्यात आली आहे. लोकशाहीच्या मार्गानं शांततेत आंदोलन सुरू आहे, 24 डिसेंबरच्या आत मराठा आरक्षण मिळवणारच, असा निर्धार मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
हे वाचलेत का ? 2023 World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस; आज India vs New Zealand यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगणार
कुठे होणार सभा ?
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. धाराशिवमधील परांडा आणि वाशी तालुक्यात त्यांची सभा होणार आहे, तर भूम तालुक्यातील ईट येथे त्यांची दुपारी 2 वाजता कॉर्नर सभा होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होणार आहे. ही सभा 125 एकर शेतात पार पडेल. आज सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे पहिली सभा होईल. दोन वाजता इट, साडेचार वाजता परंडा, रात्री आठ वाजता करमाळा येथे सभा होईल.