छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजींनगरमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरणी आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 30 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्या 10 ते 12 आंदोलकांची ओळख पटली असून, इतर अज्ञात लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे.
मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल असून बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनाची पडसाद आता विभागातील अनेक जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरमध्ये पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचा आवाहन करण्यात येत आहे.