अंतरवली सराटी : मराठा आरक्षणाचा Maratha Reservation मुद्दा अद्याप देखील रखडलेला आहे. राज्य सरकार कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण देणार असं आश्वासन एकीकडे देत असले तरीही मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हे आरक्षण अद्याप देखील अस्पष्ट आहे. दरम्यान सरसकट या शब्दावरून फिस्कटलेल्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करणार असा इशारा दिला होता. त्यानुसार आज मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईकडे कूच केले आहे.
दरम्यान एक महिना झाला तरीही सरकार गांभीर्य घेत नाही. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. अंतरवाली सराटीमध्ये मुंबई आंदोलनासाठी हालचाली सुरू असून आंदोलन देखील आक्रमक आहेत. त्याचबरोबर आंदोलकांचा आकडा देखील प्रचंड मोठा आहे. त्यासह सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस देखील अलर्ट मोडवर आहेत. विशेष म्हणजे आंतरवाली सराटी गावापासूनच या आंदोलकांसोबत मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे.
https://fb.watch/pH6tAQTziq/?mibextid=Nif5oz
यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ” आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून एक महिना झाला आहे. तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. एवढा निर्दयीपणा यांच्या अंगात असणं म्हणजेच अन्यायाचा कळस झाला. त्यामुळे शेवटी आता मराठ्यांनाच शांततेचा अस्त्र हातात घेऊन यांचं कायमचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. कारण आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं आहे. आपले मुलं मोठे झाले नको पाहिजे असं यांनी ठरवलं असेल. त्यामुळे यांचं राजकीय आयुष्य कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही. असं
जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसेच यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले होते.