नांदेड : मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा आंदोलक टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवत आहेत. आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्या केली आहे. नांदेडमधील एका 25 वर्षीय तरुणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्रशान करून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नांदेडपासून जवळच असलेल्या मरळक येथली घटना आहे. दाजीबा रामदास शिंदे असं मृत तरुणाचं नाव आहे. 11 नोव्हेंबरला विष प्रशान केल्यानंतर दाजीबा कदमला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. दाजीबा कदम यांच्याजवळ एक सुसाईड नोटही आढळून आली. सुसाईड नोटमध्ये समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आला होता. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून दाजीबाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
दाजीबा कदम हा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता, दाजीबा कदम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. आरक्षण नसल्यामुळे दाजीबा काही करू शकले नाहीत शकले नाहीत. तसेच त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली होती, असं मृत दाजीबाच्या भावानं सांगितलं आहे.