महाराष्ट्र : सध्या देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात आणि देशात आतापर्यंत तीन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. अजून दोन टप्प्यात निवडणुका पार पडायच्या शिल्लक आहेत. दरम्यान लोकसभेच्या या निवडणुकांची प्रक्रिया संपते न संपते तो विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्या आहेत.
दरम्यान येत्या जुलैला चार आमदारांचा कार्यकाळ संपतो आहे. विधान परिषदेच्या सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी सात शिक्षक आणि सात पदवीधर मतदार संघातून निवडून येत असतात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातून जागा रिक्त होणार असून निवडणूक आयोगाने आता पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यानुसार येत्या 10 जूनला मतदान होणार असून 13 जूनला मतमोजणी पार पडणार आहे.
मुंबई पदवीधर – विलास पोतनीस, कोकण पदवीधर- निरंजन देवखरे, त्याचबरोबर नाशिक शिक्षक – किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक – कपिल पाटील या चार पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागा रिक्त होणार असून येत्या 10 जूनला मतदान पार पडेल. निवडणुकीची प्रक्रिया 15 मे पासून सुरू होणार आहे. तर उमेदवारांनी 22 मे पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 24 मेला अर्जाची छाननी होणार असून 27 मे पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येऊ शकतात. त्यामुळे लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका होणार आहेत.
Shikhar Bank fraud case : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा एकदा टांगती तलवार; आता SIT चौकशी होणार ?