Junior Mehmood Passes Away : प्रदीर्घ आजाराला झुंझ देताना आज अखेर ज्युनिअर मेहेमूद Junior Mehmood यांची मृत्यूशी झुंझ Passes Away संपली आहे. पोटाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास अधिक जाणवल्यानंतर त्यांना टाटा मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता . त्यांना पोटाचा कॅन्सर असल्याचे निदान डॉकटरांनी केले. परंतु हा कॅन्सर चौथ्या स्टेज पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे उपचाराला त्यांचे शरीर साथ देऊ शकणार नाही आणि केमो थेरेपीचा त्यांना अधिक त्रास होईल असे डॉक्टरांनी सांगितल्याने त्यांना घरीच देखभालीसाठी ठेवण्यात आले होते. अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिली. आज दुपारच्या प्रार्थनेनंतर सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘ज्युनिअर मेहमूद’ हे नाव कसे मिळाले ? How did junior Mehmood get the name?
ज्युनिअर मेहमूद यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९६७ साली ‘नौनिहाल’ या चित्रपटातून केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत २६५ चित्रपटांमध्ये काम केले. ज्यात केवळ हिंदी चित्रपटच नाही तर सात वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. हिंदीबरोबरच मराठी चित्रपटांमध्ये निर्माते आणि दिग्दर्शक म्हणूनही ज्युनिअर मेहमूद यांनी वेगळी ओळख निर्माण केली.त्यांनी सुमारे सहा मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली. चार दशकांहून अधिक काळ आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्युनिअर महमूद जेव्हा इंडस्ट्रीत संघर्ष करायला आले, त्यावेळी त्याचं नाव होतं नईम सय्यद. नईम सय्यद हिंदी यांनी त्याला आपल्या काळातील प्रसिद्ध सुपरस्टार मेहमूद अली ने सिनेमाचा ‘ज्युनिअर मेहमूद’ बनवला होता. ज्येष्ठ अभिनेते मेहमूद अली यांनी हे नाव दिले.
चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी या टीव्ही मालिकांमध्येही काम केले
ज्युनियर मेहमूद यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दीत मोठ्या पडद्यावर तर काम केलेच, पण त्याचबरोबर छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू केली. 1967 मध्ये इंडस्ट्रीत प्रवेश केलेल्या ज्युनिअर मेहमूदने मोहब्बत जिंदगी है, सुहागरात, फरिश्ते, ब्रह्मचारी, विश्वास, राजा साब, प्यार ही प्यार, दो रास्ट अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.