जालना : जालना येथील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण 15 दिवसांपासून सुरूच आहे. मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली . या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांनी हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, “मी कोणाला दबत नाही , मी समाजाला दबतो. सरकारच्या म्हणण्यानुसार मी दोन पावले मागं येतो. परंतु त्यांना वेळ कशाला हवा ? आम्हाला टिकणारे आरक्षण मिळणार का ? माझं गाव भावनिक झाल आहे. महिला रडतायेत… ते माझ्या काळजाला लागते आहे. त्यामुळे मी द्विधामनस्थितीत आहे. मंगळवारी दुपारी बैठक घेऊन निर्णय कळवतो.” असं देखील उपोषण करते मनोज जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान हे उपोषण मागे घ्यावे अशी विनंती महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय नेत्यांनी केली आहे. आत्तापर्यंत उपोषण स्थळी जाऊन अनेक राजकीय नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान से संस्थापक संभाजी भिडे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, ” मी तुमच्यासोबत आहे. तुमची भूमिका योग्य आहे. मी राजकारणी नसल्याने घुमवून बोलणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे . मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शंभर टक्के यश मिळणार असून सूर्य नक्की उगवणार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं. तसेच उपोषण मागे घ्या, लढा सुरू ठेवा. अशी विनंती देखील संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना केली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करायला संभाजी भिडे विसरले नाहीत. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुरंदर आहेत. देवेंद्र फडणवीस बेइमानी करणार नाहीत अशा शब्दात त्यांनी फडणवीसांचं कौतुक केला आहे
दरम्यान संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांची उपोषण स्थळी भेट घेऊन या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दर्शवला यावेळी जरांगे पाटील म्हणाले की संभाजी भिडे गुरुजींचा मला पाठिंबा मिळणे ही भाग्याची गोष्ट असल्याचं मी मानतो.