नवी दिल्ली : महिला दिनानिमित्त आज राज्यसभेवर एक विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. केवळ देशासाठीच नाही तर जगभरामध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती Infosys co-founder Narayana Murthy यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नियुक्ती बाबत माहिती दिली आणि त्यांच्या बाबत गौरवोद्गार लिहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधा मूर्ती यांचा सोबत एक फोटो शेअर करून लिहिले आहे की, ” भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला आनंद आहे. सामाजिक कार्य ,परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचं योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या नारी शक्तीचा एक शक्तिशाली पुरावा जो आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे उदाहरण देतो. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिला आहे.
इन्फोसिस फाउंडेशनचे अध्यक्ष सुधा मूर्ती या एक लेखिका देखील आहेत. ज्या काळामध्ये महिलांचे शिक्षण म्हणजे एक कल्पना होती. त्या काळामध्ये त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. आजपर्यंत त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिले आहेत. त्यांचे पती इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांना उच्चशिक्षित प्रगल्भ विचारांनी परिपूर्ण अशा पत्नी म्हणून त्यांनी दिलेली साथ आणि खडतर प्रवास यातील त्यांचा अनुभव यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे. आज त्यांची राज्यसभेवर झालेली नियुक्ती हा महिला दिनाच्या निमित्ताने झालेला मोठा गौरवच म्हणावा लागेल.