ठाणे : मुंबईकरांसाठी लोकल Mumbai local म्हणजे जीव की प्राण आहे. अशातच मुंबईच्या लोकल यंत्रणेमध्ये सातत्याने काही ना काहीतरी बिघाड येतच आहे. या महिन्यामध्ये ही तिसरी घटना आहे की लोकलच्या दळणवळणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
आज सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये धाकधूक वाढली असतानाच आता हा सिग्नल बिघाड दुरुस्त झाला असून सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. लोकल मात्र अद्याप देखील उशिराने धावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवा पुन्हा सुस्थितीत, लोकल मात्र अद्यापही उशिराने धावत आहेत. दरम्यान मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील कल्याण ते कुर्ला दरम्यान वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे आज प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचा देखील पाहायला मिळाला आहे.