नवी दिल्ली : केंद्र सरकार Central government लवकरच सामान्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. देशात पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या Diesel किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना केंद्र सरकार कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याच्या मार्गावर आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार जागतिक कच्च्या तेलाच्या किमती कमी करून त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दरम्यान, मागील दीड वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये चढ-उतार झालेले नाहीत. 2022 मध्ये पेट्रोलवर प्रति लिटर 17 रुपये आणि डिझेलवर 35 रुपये तोटा पीएमसीला OMC झाला होता. आता सध्या परिस्थितीत पेट्रोलवर आठ रुपये आणि डिझेलवर तीन रुपये प्रति लिटर नफा होतो आहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्या OMC नफा कमवत असल्याने केंद्र सरकार सर्वसामान्यांना देखील दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.
अर्थ मंत्रालय आणि तेल मंत्रालय कच्च्या तेलाच्या किमतींबाबत विचार विनिमय करत असल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे.