पुणे : उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, ” गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं. हे घडते वेळी महेश गायकवाड यांच्याकडे देखील पिस्तूल होती. परंतु झटापटीत त्यांना ती बाहेर काढता आली नाही. असं अजित पवार म्हणाले आहेत.
आज पुण्यामध्ये ही धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ते म्हणाले की, ” उल्हासनगरमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब झाली. त्याच्यात जमिनीच्या व्यवहारातून गोळीबार झाला होता. ते दोघेही निवांत पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. एक नागरिक म्हणून पोलिसांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे. कारण आत गोळ्यांचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिवाल्वर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिवाल्वर होती. त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्या झटापटीत त्याला काढता आला नाही. तर आणखीन काही वेगळं घडलं असतं हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.