नवी दिल्ली : उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती Ethanol Production From Sugarcane करण्यावर केंद्र सरकारने Central Government बंदी घातली होती. दरम्यान आताच मिळालेल्या माहिती नुसार, केंद्राने पुन्हा माघार घेतली आहे. केंद्राने बी हेवी मोलासिसपासून इथेनॉल बनवण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने बंदी घातल्याने शेतकरी तसेच साखर कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
महाराष्ट्र साखर आणि इथेनॉल उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य असल्याने त्याचे परिणाम राज्यातही दिसू शकत होते. पण सरकारने ही बंदी उठवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावरील बंदी उठवताना 17 लाख टन साखरेच्या निर्मितीची अट ठेवली आहे. 2023-24 साठी ही अट असून ऑक्टोबर महिन्यापर्यंत ती लागू असणार आहे.
गेल्या तीन वर्षात इथेनॉल उत्पादन क्षमता 280 कोटी लिटरवरून 766 कोटी लिटर झाली आहे. बी-हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलची किंमत 59 रुपये प्रति लिटरवरून 64 रुपये प्रति लिटर करण्याची मागणी उद्योगांनी केली आहे. तसेच सी-हेवी मोलॅसिसचा दर 49 रुपये प्रति लिटरवरून 58-59 रुपये प्रति लिटर करण्याची मागणी आहे.