मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आगामी दसरा मेळाव्यासाठी एक महिना आधीच मुंबई महानगरपालिकेला शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता ठाकरे गटाकडून एक महिन्यापूर्वीच शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला आहे.
ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी सावध भूमिका घेण्यात आली आहेत. ठाकरे गटाने अर्ज करताना या वर्षी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे ठाकरे गटाचं वैभव राहिलं आहे. राज्यभरातून लाखो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी येत असतात.गेल्यावर्षी दोन मेळावे झाले होते. एकनाथ शिंदे गटाकडून बीकेसी मैदानात मेळावा घेण्यात आला होता.