महत्वाची बातमी : तुमच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी शेवटचे 4 दिवस उरले आहेत. जर तुम्ही 2,000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या नसतील तर हे काम 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे लागणार आहे. तुम्हाला नोटा बदलायच्या असतील तर जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही नोटा बदलू शकता. मात्र एका दिवसात फक्त 10 नोटा बदलता येतात. त्यामुळे आता नोटा बदलण्यासाठी फक्त चार दिवस बाकी आहेत.
आरबीआयच्या मते आतापर्यंत 2,000 रुपयांच्या 93% नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत, म्हणजे फक्त 7% नोटा परत आल्या नाहीत. 2,000 रुपयांच्या नोटा तुमच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी केवायसी नियम आणि इतर कायदेशीर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच हे नियम प्रत्येक बँकेनुसार वेगळे आहेत.