भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशात सैन्य दलासोबत दसरा विजयादशमी साजरी केली. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारत-चीन सीमेवर शस्त्रपूजन करण्यात आलं.
https://x.com/ANI/status/1716687558112157924?s=20
शस्त्रपूजनाचा व्हिडीओ ट्विटर एक्सवर शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, ‘विजयादशमीच्या पवित्र दिवशी तवांगमध्ये शस्त्रपूजा’. जवानांना संबोधन करताना संरक्षण मंत्र्यांनी जवानांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, मी आजच्याच दिवशी 4 वर्षांपूर्वी येथे आलो होतो, मला वाटले की मी तुमच्यासोबत विजयादशमी साजरी करावी. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेता त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो.
https://x.com/ANI/status/1716694652429156438?s=20
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, बहुतेक सैनिकांना एकदा सैन्यात सेवा करण्याची इच्छा असते. टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून लष्कराचा गणवेश आपल्या अंगावर यावा, अशी राजकारणातील नेत्यांचीही इच्छा असते. देशातील नागरिकांना या गणवेशाचे महत्त्व माहित आहे. देशाच्या नागरिकांना सैनिकांप्रती आदर आहे.