सध्या सर्वत्र सणासुदीची धामधूम सुरु आहे. आज नवरात्रोत्सवाचा शेवटचा म्हणजेच नववा दिवस आहे. एकंदरीत हा सण देशभरात मोठ्या जल्लोषात पार पडला. भाविकांनी या नवरात्रोत्सवात नऊ दिवशी नऊ वेगवेळी रुपये धारण करून देवीची आराधना केली. या नवरात्रोत्सवाचा शेवट (24 ऑक्टोबर 2023) ला विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडतो. हा दिवस नागरिक मोठ्या जल्लोषात साजरा करतात.
दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. यादिवशी सर्व शुभ कार्य केले जाते. हा वर्षाचा सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण आहे. या दिवसाला एक ऐतिहासिक महतव आहे. पौराणिक मान्यतांनुसार या दिवशी दुर्गा देवीने चंडीचे रूप धारण करून महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. महिषासुर या राक्षसाने व त्याच्या सैन्याने देवीला मोठ्या प्रमाणात हैराण केल्यामुळे देवीने या राक्षसाशी सलग नऊ दिवस युद्ध केले आणि 10 व्या दिवशी महिषासुराचा अंत केला. त्यामुळे नवरात्रीनंतरच्या दिवशी विजयादशमी हा साजरा करण्याची परंपरा रुजू झाली आहे. तसेच विजयादशमीच्या दिवशीच प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून वध केला त्यामुळे या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीराम आणि देवीच्या या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते.
याशिवाय दसरा या सणाच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा अनेक काळापासून चालत आली आहे. या शुभ दिवशी शस्त्रांच्या पूजेबरोबरच लोक वाहनांची देखील पूजा करतात. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी अनेक शुभ कामांची सुरुवात देखील केली जाते. याशिवाय तुम्हाला हे माहित आहे का? दसऱ्याच्या शुभ दिवशी शमीच्या झाडाची म्हणजेच आपट्याच्या पानाची पूजा केली जाते. यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
जाणून घ्या दसऱ्याला आपट्याच्या पानाची का केली जाते पूजा
देशात साजरा होणाऱ्या प्रत्येक सणांमागे एक धार्मिक कारण आहे. जसे कि दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाची पूजा केली जाते. देशात साजरा होणाऱ्या प्रत्येक सणांमागे निसर्गाशी संबंध जोडलेला आहे. त्यामुळे निसर्गातल्या प्रत्येक गोष्टींची देवता म्हणून पूजा केली जाते. विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून नवीन कामांना सुरुवात केली जाते. यामुळे नव्याने सुरु केलेल्या कामाला निश्चित यश मिळते. याशिवाय पांडवांचा अज्ञातवास हा दसऱ्याच्या दिवशीच संपला होता. हा अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या (आपट्याच्या) झाडावरची आपली शस्त्रे परत घेतली होती. तेव्हा त्याच दिवशी विराटाच्या गाई पळवणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला होता. या कथेमुळे गावोगावी दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने हे सोने म्हणून वाटले जाते.
जाणून घ्या दसऱ्याला शस्त्र पूजा का केली जाते ?
दसरा हा सण नवीन व्यवसायाला सुरवात करण्याचा योग्य सण आहे. या दिवशी नव्याने व्यवसाय सुरु केला तर यश हे मिळतेच असे मानले जाते. मात्र या दिवशी शस्रांचीपूजा केली जाते. यामागे एक धार्मिग कारण आहे. प्राचीन काळी क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी कित्येक दिवस दसरा या सणाची वाट पाहत असत. या दिवशी ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने असत्याचा पराभव पराभव करून विजय मिळवला त्याचप्रमाणे दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला करून विजय मिळवला होता. अगदी तीच परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये रुजून दसऱ्याच्या दिवशी कोणतेही युद्ध सुरू झाले तरी त्याचा विजय हा निश्चित होतो असे मानले जात होते. त्यामुळे विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जात असे. तेव्हापासून दसऱ्याला शस्रांची पूजा केली जाते.