मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडच्या Coastal Road दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज पार पडले आहे. हा मार्ग आता 11 जून 2024 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी या मार्गाची आज पाहणी केली आणि त्यानंतर कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आल आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोस्टल रोडचे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ” आम्हाला सुद्धा मोठी सुविधा होणार आहे. आज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. यापूर्वी पहिला बोगदा सुरू करण्यात आला होता. खूपच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर करून या बोगद्याचं काम करण्यात आलं आहे. या कोस्टल रोडमुळे 40 ते 50 मिनिटांचा प्रवास आता केवळ आठ मिनिटात होणार आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल आहे.
आज या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आल असून 11 जून पासून सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत असा एकूण सोळा तासांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असणार आहे.
कोस्टल रोडची वैशिष्ट्ये
- मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत आहे.
- या रस्त्याची लांबी 10.58 कि.मी. असून हा फोर लेन आहे.
- बोगद्यामध्ये दोन्हीही बाजूला प्रत्येकी तीन लेन असून भराव टाकून बनविलेल्या रस्त्याची लांबी 4.35 किलोमीटर आहे. तर पुलाची एकूण लांबी ही 2.27 किलोमीटर आहे.
- समुद्री लाटांपासून बचावासाठी सात पूर्णांक 7.47 किलोमीटर लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे
- या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली, वरळी डेअरी, थडानी जंक्शन, वरळी या ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे