• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

काश्मीर खोऱ्यात दुमदुमला छत्रपतींचा जयघोष; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Web Team by Web Team
November 7, 2023
in मुख्य बातम्या
0
काश्मीर खोऱ्यात दुमदुमला छत्रपतींचा जयघोष; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल, त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. पुतळा अनावरणाच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला.

आम्ही पुणेकर’ संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. समोरच्या पर्वंतरांगापलिकडे असलेल्या पाकिस्तामनध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून त्याठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला याला मोठे महत्व आहे. याठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघ नखे राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता काश्मीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिर येथे जी २० परिषद घेतली, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. कुपवाडा येथे असलेले हे स्मारक जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनेल. आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. हे स्मारक महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आता दरवर्षी कुपवाडा येथे शिवाजी महाराज पर्व- नायब राज्यपाल मनोज सिन्हा

आज कुपवाडा येथे नव्या परंपरेला सुरूवात झाली असून यापुढे प्रत्येक वर्षी कुपवाडा येथे ७ नोव्हेंबरला शिवाजी महाराज पर्व साजरे करण्यात यावे, असे आवाहन नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी जवानांना केले. ‘स्वत:वर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या सोबत असेन’ शिवाजी महाराजांनी शूरवीरांना दिलेला हा संदेश मराठीतून वाचत श्री. सिन्हा यांनी विविध इतिहासकार आणि कवींनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांना उजाळा दिला.

शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक- मंत्री सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे. उर्जा आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग दाखविण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडनमध्ये करार करण्यात आला. राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री. शिरोळे, मेजर जनरल गिरीश कालिया यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा बटालियनचे जवान, लष्करी अधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुतळा अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही रात्रं-दिवस सीमेवर प्राणपणाने बाजी लावून देशाचे रक्षण करतात. त्यामुळे आम्ही सर्व सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Previous Post

वायु प्रदूषणात झालेली वाढ पाहता महाराष्ट्र सरकारने फटाक्यांसोबतच अगरबत्ती आणि कॉइलचा वापर टाळण्याचा दिला सल्ला

Next Post

Supreme Court : दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी; लोकांनी पर्यावरणाचा विचार करण्याची गरज

Next Post
Supreme Court : दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी; लोकांनी पर्यावरणाचा विचार करण्याची गरज

Supreme Court : दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी; लोकांनी पर्यावरणाचा विचार करण्याची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Vijay Wadettiwar : ही मॅच फिक्सिंग आहे का ? विजय वडेट्टीवारांची मनोज जारांगेंवर घणाघाती टीका

Vijay Wadettiwar : ही मॅच फिक्सिंग आहे का ? विजय वडेट्टीवारांची मनोज जारांगेंवर घणाघाती टीका

1 year ago
… तर असा आहे शाहरुख खानच्या ‘DUNKY’ चित्रपटाचा अर्थ, अखेर अभिनेत्याने दूर केला हा संभ्रम

… तर असा आहे शाहरुख खानच्या ‘DUNKY’ चित्रपटाचा अर्थ, अखेर अभिनेत्याने दूर केला हा संभ्रम

2 years ago
बैठकीला बोलवलं आणि तासभर बाहेरच बसवलं ! वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची संतप्त प्रतिक्रिया

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधे ‘त्या’ 8 जागांसाठी अंतर्गत खलबती, कोणाला मिळणार संधी ?

1 year ago
Pune Crime News : पुणे जिल्ह्यात खळबळजनक प्रकार; 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : पुणे जिल्ह्यात खळबळजनक प्रकार; 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.